‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना चौकशीसाठी हजर रहाण्याचे आदेश BCCI चे लोकपाल डी के जैन यांनी दिले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वी या २ खेळाडूंवर निलंबनाची कारवाई केली होती. पण नंतर काही दिवसांनी या दोघांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली. पण या दोघांपुढील अडचणी अजून संपलेल्या नसून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी या दोघांना नोटीस बजावली आहे.
या प्रकरणी BCCI ने पांड्या व राहुल यांना तात्पुरते निलंबित केले होते. मात्र, लोकपालांकडून निकाल येण्यापूर्वीच त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली. या प्रकरणात BCCI ने पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकलेली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका आणि न्यूझीलंड दौरा होण्याआधी हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. CoA कडून ही घोषणा करण्यात आली होती. मात्र ही बंदी तात्पुरती उठवण्यात उठवण्यात आली होती. कारण त्यावेळी BCCI वर लोकपाल (ओमडसमन) नेमण्यात आला नव्हता. पण लोकपालांची नेमणूक करण्यात आल्यानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी मागील आठवड्यात नोटीस पाठवली असल्याचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी सांगितले. तसेच, ‘नियमानुसार त्यांची बाजू ऐकावी लागणारच. पण साक्ष द्यायला कधी यायचं याचा निर्णय त्यांनी घ्यावा’, असेही जैन यांनी स्पष्ट केले.
महिलांबाबात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी या दोघांनाही बीसीसीआयने आस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत बोलवले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2019 5:51 pm