News Flash

‘कॉफी विथ करण’ प्रकरणी हार्दिक पांड्या, राहुलला २० लाखांचा दंड

महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पडलं महागात; शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे दिले आदेश

कॉफी विथ करण या शो मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना BCCI चे लोकपाल डी के जैन यांनी २० लाखांचा दंड ठोठवला आहे. यातील १० लाख हे शहीद निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना तर १० लाख हे अंध क्रिकेटच्या निधीसाठी आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी देण्याचे आदेश BCCI चे लोकपाल यांनी दिले आहेत.

या २० लाख रूपयांच्या दंडाच्या रकमेतील १० लाख कर्तव्य बजावताना शहीद झालेले निमलष्करी दलातील १० जवान यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख अशा प्रमाणे मदत निधी म्हणून दोघांनीही द्यावा. तसेच १० लाख रुपये हे अंध क्रिकेटच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या संघटनेला मदत म्हणून द्यावा, असे आदेश लोकपाल डी के जैन यांनी दिले आहेत. हि रक्कम त्यांनी ४ आठवड्यांच्या आत जमा करायची आहे. जर ही दंडाची रक्कम त्यांनी दिलेल्या कालावधीत जमा केली नाही, तर BCCI ला त्यांच्या सामन्याच्या मानधनातून ती रक्कम कापून घेण्याचे हक्कदेखील लोकपाल यांनी दिले आहेत.

‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना चौकशीसाठी हजर रहाण्याचे आदेश BCCI चे लोकपाल डी के जैन यांनी दिले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वी या २ खेळाडूंवर निलंबनाची कारवाई केली होती. पण नंतर काही दिवसांनी या दोघांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली. पण या दोघांपुढील अडचणी संपलेल्या नव्हत्या. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी या दोघांना नोटीस बजावल्या होत्या.

या प्रकरणी BCCI ने पांड्या व राहुल यांना तात्पुरते निलंबित केले होते. मात्र, लोकपालांकडून निकाल येण्यापूर्वीच त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली. या प्रकरणात BCCI ने पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकलेली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका आणि न्यूझीलंड दौरा होण्याआधी हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. CoA कडून ही घोषणा करण्यात आली होती. मात्र ही बंदी तात्पुरती उठवण्यात उठवण्यात आली होती. कारण त्यावेळी BCCI वर लोकपाल (ओंबडसमन) नेमण्यात आला नव्हता. पण लोकपालांची नेमणूक करण्यात आल्यानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी नोटीस पाठवली असल्याचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी सांगितले. तसेच, ‘नियमानुसार त्यांची बाजू ऐकावी लागणारच. पण साक्ष द्यायला कधी यायचं याचा निर्णय त्यांनी घ्यावा’, असेही जैन यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, महिलांबाबात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी या दोघांनाही बीसीसीआयने आस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत बोलवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:39 pm

Web Title: koffee with karan show hardik pandya kl rahul fined 20 lakh by bcci ombudsman in 4 weeks
Next Stories
1 IPL 2019 : …आणि कुलदीपला मैदानावरच रडू कोसळलं
2 ipl 2019 : धडपडणाऱ्या राजस्थानसमोर मुंबईचे आव्हान
3 ipl 2019 : तिसऱ्या स्थानासाठी दिल्ली, पंजाबमध्ये झुंज
Just Now!
X