News Flash

‘कोहलीची आक्रमक शैली ही नैसर्गिकच’

तो एका महान संघाचा कर्णधार आहे हे त्याने विसरू नये,’’ असे वॉ यांनी सांगितले.

| February 28, 2018 02:45 am

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची आक्रमक शैली व वागणे हा त्याच्या कौशल्यात होत असलेल्या विकासाचाच नैसर्गिक भाग आहे. त्याच्या करिष्म्यामुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात विजय मिळवता आला, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी सांगितले.

कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारताने एकदिवसीय व ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयश्री खेचून आणली. त्यांच्या  या विजयात कोहलीच्या तडाखेबाज फलंदाजीचा मोठा वाटा होता.

‘‘कोहलीविषयी मला नितांत आदर आहे. तो संघाचे नेतृत्व कुशलतेने करीत आहे यात तिळमात्र शंका नाही. परंतु कोहलीने संघातील सहकाऱ्यांकडून स्वत:च्या शैलीइतकी अपेक्षा करणे चुकीचे असते. प्रत्येक खेळाडू त्याच्याइतका तरबेज नसतो. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा हे शांत स्वभावाचे खेळाडू आहेत. त्यांना त्यांच्या शैलीने खेळण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. कोहलीने स्वत:च्या स्वभावावर व भावनांवर थोडे बंधन घालण्याची गरज आहे. तो एका महान संघाचा कर्णधार आहे हे त्याने विसरू नये,’’ असे वॉ यांनी सांगितले.

‘‘भारतीय संघाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवावे अशी कोहलीची इच्छा आहे. सध्याच्या कालावधीत हे साध्य करणे आव्हानात्मक आहे. कोणत्याही अव्वल दर्जाच्या संघाला काही वेळा निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागत असते. यश व अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेथे घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व राहणार,’’ असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 2:40 am

Web Title: kohli aggressive style is natural says steve waugh
Next Stories
1 नेयमारला गंभीर दुखापत
2 नेतृत्वाच्या जबाबदारीकडे लक्ष केंद्रित -अश्विन
3 नीरज, नयना, नवनीत राष्ट्रकुलसाठी पात्र
Just Now!
X