भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर आयसीसीने वन-डे क्रिकेटची सुधारीत क्रमवारी जाहीर केली आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलर, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि पाकिस्तानच्या फखार झमानच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली आहे. आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतले सर्वोत्तम 10 फलंदाज - 1) विराट कोहली 2) रोहित शर्मा 3) रॉस टेलर 4) जो रुट 5) बाबर आझम 6) डेव्हिड वॉर्नर 7) फाफ डु प्लेसिस 8) शिखर धवन 9) केन विल्यमसन 10) क्विंटन डी-कॉक आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतले सर्वोत्तम 10 गोलंदाज - 1) जसप्रीत बुमराह 2) राशिद खान 3) कुलदीप यादवट 4) कगिसो रबाडा 5) युझवेंद्र चहल 6) आदिल रशिद 7) ट्रेंट बोल्ट 8) मुजीब उर रेहमान 9) जोश हेजलवूड 10) मुस्तफिजूर रेहमान