भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्याच्या या खेळीवर बांगलादेशचा सलामीवीर तमिम इक्बाल सध्या भलताच खूश आहे. कधीकधी मैदानावर खेळत असताना कोहली हा माणूस वाटतच नाही, दुबईत ‘Khaleej Times’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तमिम इक्बालने विराटच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे.

“कधीकधी विराट मला मैदानावर माणूस वाटतच नाही. ज्या पद्धतीने तो खेळतो हे थक्क करण्यासारखं आहे. जणूकाही प्रत्येक सामन्यात तो शतक झळकावणार आहे या अविर्भावात विराट मैदानात वावरतो. प्रत्येक सामन्याआधी त्याचा सराव, त्याची मेहनत या गोष्टी वाखणण्याजोग्या आहेत”, तमिमने कोहलीची स्तुती केली.

अवश्य वाचा – Ind vs WI : दुसऱ्या वन-डे सामन्यासाठी भारतीय संघात बदल नाही

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी कोहलीला 81 धावा हव्या आहेत. अशी कामगिरी केल्यास विराट सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल. माझ्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत मी अनेक दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहिलं आहे. प्रत्येक खेळाडूच्या काही सकारात्मक गोष्टी होत्या, मात्र विराट हा सर्वांपेक्षा वेगळा वाटतो, तमिम विराटबद्दल होता.