भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीवर काही जणांकडून टीका होत आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या आक्रमक वृत्तीवर माजी क्रिकेटपटूंकडून टीका होत असताना त्यावर शांत राहणे कोहलीने पसंत केले. इशांतवरील कोणत्याही प्रश्नांवर मी उत्तर देणार नाही, असे कोहलीने स्पष्ट केले.
तिसऱ्या कसोटी सामन्यात अतिआक्रमक झाल्याबद्दल इशांतवर एका कसोटी सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये इशांतला खेळता येणार नाही. याबद्दल कोहलीला विचारले असता तो म्हणाला की, ‘‘मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही. यापूर्वी काहीही घडले नाही, यापुढेही काही घडणार नाही.’’
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अजूनही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. याबद्दल विचारल्यावर कोहली म्हणाला की, ‘‘ हा प्रश्न माझ्यासाठी नाही. या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही.’’

आय एम अ कमिटेड मॅन
संघाबाबतच्या प्रश्नांवर शांत राहणाऱ्या कोहलीने प्रियसी अनुष्का शर्माबाबतच्या आपल्या नात्यावर आवर्जून भाष्य केले. ‘आय एम अ कमिटेड मॅन’ असं म्हणत त्याने अनेक तरुणींना नाराज केले.