मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली धावांचा पाठलाग करण्यात सर्वोत्तम फलंदाज आहे, असे कौतुकोद्गार ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने काढले आहेत.

‘‘कोहली हा विलक्षण खेळाडू आहे. तो तंदुरुस्त असून ताकदवान आहे. क्रिकेटसाठी हे दोन्ही गुण महत्त्वाचे असतात. पांढऱ्या चेंडूने खेळण्यात येणाऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करण्यात कोहली सर्वोत्तम आहे,’’ असे कौतुकोद्गार स्मिथने काढले.