कोल्हापूर संघाने सहा सुवर्ण, सहा रौप्य व चार कांस्यपदके मिळवित राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती.
मुंबईने पाच सुवर्ण, पाच रौप्य व आठ कांस्य अशी एकूण १८ पदके मिळवित उपविजेतेपद पटकाविले. तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या पुण्याने तीन सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई केली. नाशिक संघास चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांनी दोन सुवर्ण, पाच रौप्य व एक कांस्य अशी एकूण आठ पदके मिळविली. एअर रायफल पीपसाईट प्रकारात नाशिकच्या प्रतीक बोरसे याने मुलांच्या गटात सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला. त्याने ३११ गुणांची नोंद केली. मुलींमध्ये कोल्हापूरच्या अनुष्का पाटील हिने ३०१ गुणांसह सवरेत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक मिळविले. पिस्तूल विभागात नाशिकच्या प्रशांत शिंदे सवरेत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला.