05 July 2020

News Flash

कोरबो, लोरबो, जीतबो रे..

ईडन गार्डन्सच्या व्यासपीठावर लक्षावधी क्रिकेटरसिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा खास गौरव केला.

| June 4, 2014 01:20 am

ईडन गार्डन्सच्या व्यासपीठावर लक्षावधी क्रिकेटरसिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा खास गौरव केला. अभिनेता शाहरूख खान दोन तास उशिराने या कार्यक्रमाला हजर राहिला. परंतु त्यामुळे कार्यक्रमावर कोणताही परिणाम झाला नाही. मग संघाचा मालक शाहरूखने आपल्या संपूर्ण संघासोबत ईडन गार्डन्सवर एक विजयी फेरी मारली. ‘कोरबो, लोरबो, जीतबो रे.. अमी कोलकाता, आमचे राज्य’ हा एकच जयघोष सुरू होता. कर्णधार गौतम गंभीरने चषकासह या विजयी फेरीचे नेतृत्व केले. यावेळी सहमालकीण जुही चावलासुद्धा सामील होती.या कार्यक्रमाला उशिराने हजर राहणाऱ्या शाहरूखने ‘ट्विटर’च्या माध्यमातून आपली दिलगिरी प्रकट केली. ‘‘विमान वाहतुकीत तांत्रिक अडचणींमुळे मी उशिराने पोहोचेन. पण नक्की येईन. कोलकातावासी मला माफ करा. दिलगिरी प्रकट करतो.’’त्याआधी, आठ खुल्या वाहनांतून कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू विजयी आवेशात स्टेडियममध्ये दाखल झाले.
क्रिकेटरसिकांना स्टेडियमच्या आत पोहोचण्यासाठी सुरक्षेचे अनेक अडथळे पार करावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2014 1:20 am

Web Title: kolkata knight riders get grand felicitation at eden gardens
Next Stories
1 कोलंबियाच्या फाल्काओची दुखापतीमुळे माघार
2 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : मरेची आगेकूच
3 भ्रष्टाचाराची चौकशी ही खेळासाठी चिंताजनक -सचिन
Just Now!
X