News Flash

IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सला धक्का, मराठमोळा खेळाडू संघाबाहेर

२० लाखांच्य बोलीवर घेतलं होतं संघात

आयपीएलचा आगामी हंगाम सुरु होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू प्रवीण तांबे आगामी हंगामात खेळू शकणार नाहीये. दुबईत पार पडलेल्या T-10 लिगमध्ये सहभागी झाल्यामुळे प्रवीणवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर IANS वृत्तसंस्थेला माहिती दिली.

“बीसीसीआयचा नियम खूप स्पष्ट आहे, आयपीएल किंवा कोणत्याही राज्य संघाकडून खेळणारा भारतीय खेळाडू इतर देशांमधील लिग स्पर्धेत खेळू शकत नाही. टी-१० लिगमध्ये खेळल्यानंतर तो नियमानुसार आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने माहिती दिली. कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात प्रवीण तांबेवर २० लाखांची बोली लावली होती.

प्रवीण तांबेवर कोलकाता नाईट रायडर्सने २० लाखांची बोली लावली होती.

२०१३ साली प्रवीण तांबेने वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत ३३ सामन्यांमध्ये तांबेच्या नावावर २८ बळी जमा आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार असून, मुंबईच्या वानखेडे मैदानात पहिला सामना रंगणार आहे. त्यामुळे तांबेच्या बदल्यात कोलकाता नाईट रायडर्स आपल्या संघात कोणाला सामावून घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 3:08 pm

Web Title: kolkata knight riders spinner pravin tambe not eligible to play in ipl as per bcci rules psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 T20 World Cup मध्ये होऊ शकतो महत्त्वाचा बदल
2 BLOG : शंका घेण्यास वाव आहे !
3 IND vs AUS : विराट की स्मिथ… सर्वोत्तम कोण? गंभीर म्हणतो…
Just Now!
X