News Flash

आयपीएलच्या सराव शिबिरासाठी ‘या’ संघाचा क्वारंटाइन कालावधी सुरू

संघाने पोस्ट शेअर करत दिली माहिती

आगामी आयपीएलसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज याआधीच दणकून सरावाला लागला आहे. आता अजून एक संघ सरावासाठी सज्ज झाला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आयपीएलच्या प्रशिक्षण शिबिरासाठी सज्ज झाला आहे. पण, तत्पूर्वी संघातील खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना सात दिवसांसाठी क्वारंटाइन राहावे लागणार आहे. लीगची दोन विजेतेपदे पटकावलेल्या केकेआरने क्वारंटाइन कालावधीपूर्वी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि फलंदाज राहुल त्रिपाठी यांचा फोटो शेअर केला.

”क्वारंटाइन टाइम. खेळाडू या हंगामासाठी सज्ज आहेत. शिबिराला सुरुवात होणार आहे”, असे केकेआरने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आयपीएल 2021चा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केकेआरचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 11 एप्रिल रोजी चेन्नईत होणार आहे.

 

मागील हंगामात अर्ध्या सामन्यांपर्यंत कार्तिकने कोलकाताचे नेतृत्व केले होते, त्यानंतर मॉर्गनला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले.

कोलकाताने या खेळांडूना केले आहे रिटेन

ईऑन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुबमन गिल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टीम सेफर्ट.

यंदाच्या लिलावातून केकेआरने संघात घेतलेले खेळाडू

  • शाकिब अल हसन, बांगलादेश – 3.2 कोटी
  • हरभजन सिंग, भारत – 2 कोटी
  • बेन कटिंग, ऑस्ट्रेलिया – 75 लाख
  • करुण नायर, भारत – 50 लाख
  • वैभव अरोरा, भारत – 20 लाख
  • शेल्डन जॅक्सन, भारत – 20 लाख
  • वेंकटेश अय्यर, भारत – 20 लाख
  • पवन नेगी, भारत – 50 लाख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 4:44 pm

Web Title: kolkata knight riders started quarantine for training camp adn 96
Next Stories
1 IPL 2021: बीसीसीआयची बबल-टू-बबल ट्रान्सफरसाठी मान्यता
2 IPL 2021: विराट कोहलीच्या RCB ला मोठा धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार
3 IPL 2021 ची तारीख ठरली! आता फक्त GC च्या परवानगीची प्रतिक्षा!
Just Now!
X