News Flash

विजयपथावर परतण्याचे कोलकाताचे लक्ष्य

त्यामुळे दिल्लीच्या चमूत चैतन्याचे वातावरण आहे.

दिल्ली डायनामोजविरुद्ध घरच्या मैदानावर सामना

प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर सलग दोन पराभव पत्करणाऱ्या गतविजेत्या अ‍ॅटलेटिको डी कोलकातासमोर विजयपथावर परतण्याचे लक्ष्य आहे. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर होणाऱ्या इंडियन सुपर लीगच्या लढतीत यजमानांसमोर दिल्ली डायनामोजचे आव्हान आहे.
आयएसएलच्या दुसऱ्या सत्राची दमदार सुरुवात करणारा कोलकाताचा संघ गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्यांना घरच्या मैदानावर विजय आवश्यक आहे. दुखापतीमुळे त्यांचा प्रमुख खेळाडू हेल्डर पोस्टिगाला मायदेशी परतावे लागले आहे, त्याचबरोबर मध्य बचावपटू जोस गोंझालेज रे यानेही स्पध्रेतून माघार घेतल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या कामगिरीवर दिसत आहे.
दुसरीकडे दिल्लीने पाच सामन्यांत तीन विजय मिळवून अव्वल चारमध्ये स्थान पक्के केले आहे. मात्र, गतलढतीत मुंबई सिटी एफसीकडून झालेल्या पराभवामुळे त्यांचे मनोबल खचले आहे. संघाचे मनोबल उंचावण्यासाठी प्रशिक्षक आणि प्रमुख खेळाडू रॉबेटरे कार्लोस यांनी कोलकाताविरुद्ध मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या चमूत चैतन्याचे वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 7:21 am

Web Title: kolkata will win at home ground
Next Stories
1 हॉकी इंडियाची ‘साइ’सोबत भागीदारी
2 मुंबई सिटीची विजयी हॅट्ट्रिक
3 युकीचे आव्हान कायम
Just Now!
X