27 September 2020

News Flash

जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतपद भारताच्या हम्पीनं पटकावलं

चीनच्या लेई टिंगजीचा केला पराभव

रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपदावर भारताच्या कोनेरू हम्पीनं नाव कोरलं. हम्पीनं चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव केला. महिला गटातील विजेतेपद हम्पीनं मिळवलं, तर पुरूष गटातील विजेतेपद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसह यांनं पटकावलं आहे.

पहिला फेरीमध्येच हम्पीचा पराभव झाला, त्यानंतर दुसऱ्या फेरीत मुंसडी मारत पुनरागमन केलं. त्यानंतर झालेल्या १२व्या फेरीपर्यंत हम्पीनं नऊ गुण मिळवत ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. हम्पी आणि टिंगजीचे गुण समान झाल्यामुळे विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीने करण्यात आला. अखेरच्या निर्णायक गेमसह हम्पीनं विजेतेपद पटकावले.

ही माझ पहिलंच विश्वविजेतपद आहे. त्यामुळे या विजयामुळे खुप आनंदी आणि उत्साही आहे. पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या फेरीध्ये मला वापसी करता आली. दुसरी फेरीही अवघड होती पण त्यात मी विजय मिळवला. अखेरच्या गेममध्ये माझी स्थिती चांगली होती. त्यामुळे मला सहज विजय मिळवू शकले,” अशी प्रतिक्रिया हम्पीनं विजयानंतर दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 8:07 pm

Web Title: koneru humpy won world rapid chess championship bmh 90
Next Stories
1 बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा दारूण पराभव
2 प्रस्थापितांचे वर्चस्व, नव्यांचे पर्व!
3 धोनीविषयी कोहली आणि निवड समितीला कल्पना!
Just Now!
X