विजयी हॅट्ट्रिकसह अव्वल स्थानी; थायलंडकडून केनियाचा धुव्वा

निर्णायक क्षणी जिगरबाज खेळ करत रंगतदार लढतीमध्ये गुरुवारी कोरियाने बांगलादेशला ३५-३२ असे पराभूत केले आणि विश्वचषक कबड्डी स्पध्रेत विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. या विजयासह कोरियाने ‘अ’ गटात अव्वल स्थानही पटकावले. १५ गुण मिळवत यांग कुन ली हा कोरियाच्या विजयाचा नायक ठरला. याचप्रमाणे थायलंडने केनियाचा धुव्वा उडवला.

Gujarat Titans vs Punjab Kings Match Highlights in Marathi
PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय, राहुल तेवतिया-साई किशोरचे शानदार प्रदर्शन
US to impose new sanctions against Iran
इस्रायलवर केलेला हल्ला इराणला भोवणार, अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ

बांगलादेशने सामन्याची दमदार सुरुवात करत नवव्याच मिनिटाला कोरियावर पहिला लोण चढवत ९-० अशी आघाडी घेतली होती. पण या लोणनंतर कोरियाने झोकात पुनरागमन केले. नेत्रदीपक चढाया करत कोरियाने सामन्याचा नूर पालटला. सामन्याच्या १७व्या मिनिटाला त्यांनी बांगलादेशवर लोण चढवला. मध्यंतरापूर्वीच्या चढाईमध्ये डाँग जीऑन ली याने बोनस गुण संघाला १५-१५ अशी बरोबरी करून दिली. मध्यंतरानंतर बांगलादेशने लोण चढवत २५-१८ अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर यांग कुन ली याने नेत्रदीपक खेळ केला. ३८व्या मिनिटाला त्याने चढाईत बांगलादेशच्या तीन खेळाडूंना बाद केले. त्यानंतरच्या दोन चढाईंमध्ये त्याने संघाला ३४-२८ अशी आघाडी मिळवून देत विजयावर शिक्कामोर्तब केले.

अन्य सामन्यांत चार लोणसहित थायलंडने केनियाचा सामन्यात ५३-२१ असा सहज पराभव केला. सुरुवातीपासूनच थायलंडचा संघ आक्रमक होता, त्यांनी एकदाही केनियाला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली नाही. थायलंडचा कर्णधार खोमसान थोंगखामने चढाईमध्ये चार बोनस गुणांसह एकूण १८ गुणांची कमाई केली.

आजचे सामने

  • वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून
  • इंग्लंड वि. अर्जेटिना
  • अमेरिका वि. पोलंड
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २,३.