30 October 2020

News Flash

Korea Open Badminton : नोझुमी ओकुहाराची सायना नेहवालवर मात, भारताच्या ‘फुलराणी’चं आव्हान संपुष्टात

ओकुहारा पुन्हा एकदा सरस ठरली

सायना नेहवाल (संग्रहीत छायाचित्र)

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझुमी ओकुहाराने सायनाचा १५-२१, २१-१५, २२-२० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिला सेट आघाडी जिंकत आघाडी घेतलेल्या सायनाला उर्वरित दोन सेटमध्ये आपला खेळ कायम राखता आला नाही, ज्याचा फायदा घेत ओकुहाराने सामन्यात बाजी मारली.

पहिल्या सेटच्या सुरुवातीला ओकुहाराने ३-० अशी आघाडी घेतली होती. मात्र सायनाने चांगली लढत देत ओकुहाराची आघाडी कमी केली. अखेर सलग ३ गुण मिळवत सायनाने ओकुहाराला पहिल्या सेटमध्ये मागे टाकलं. मध्यांतरापर्यंत सायनाने ११-९ अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर सायनाने आपल्या खेळाची गती वाढवत काही चांगले फटके खेळले. या जोरावर सायनाने पहिल्या सेटमध्ये १५-२१ अशी बाजी मारली.

दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने सामन्याचं चित्रच पालटवून टाकलं. आक्रमक फटक्यांचा वापर करत ओकुहाराने सायनाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. २१-१५ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत ओकुहाराने सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. यानंतर निर्णयाक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलाच सामना रंगला. मात्र अखेरच्या क्षणात बाजी मारत ओकुहाराने सायनावर मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 5:50 pm

Web Title: korea open badminton 2019 nozumi okuhara beat saina nehwal enters semi final
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 भारताकडून बांगलादेशी वाघांची शिकार, आशिया चषकावर भारताची ‘सत्ता’!
2 Asia Cup 2018 : …..आम्ही त्यावेळीच स्पर्धा जिंकली होती – मश्रफी मोर्ताझा
3 Asia Cup Final 2018 : बांगलादेशला हलकं लेखण्याची चूक भारत करणार नाही – शिखर धवन
Just Now!
X