News Flash

Korea Open : कश्यपची उपांत्य फेरीत धडक

डेन्मार्कच्या जॉर्गन्ससनचा सरळ सेटमध्ये उडवला धुव्वा

Korea Open World Tour Super 500 : भारताचा बॅटमिंटनपटू परूपल्ली कश्यप याने कोरिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. डेन्मार्कच्या जान ओ जॉर्गन्ससन याचा त्याने दोन सरळ गेममध्ये पराभव केला. ३३ वर्षीय कश्यपने जॉर्गन्ससनला केवळ ३७ मिनिटांच्या खेळात पराभूत केलं. त्याने सामना २४-२२, २१-८ अशा सरळ गेममध्ये जिंकला. पहिला गेम अत्यंत चुरशीचा झाला. पण त्या गेममध्ये कश्यप सरस ठरला. त्याने केवळ २ गुणांच्या फरकाने गेम जिंकला. दुसरा गेमदेखील अटीतटीचा होणार अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण दुसरा गेम पूर्णपणे एकतर्फी झाला. दुसरा गेम २१-८ असा जिंकत प्रतिस्पर्धाचा धुव्वा उडवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 4:42 pm

Web Title: korea open world tour super 500 indian shuttler parupalli kashyap enter semi final vjb 91
Next Stories
1 …..म्हणून महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात नाही, जाणून घ्या कारण !
2 Ind vs SA : पहिल्या कसोटीमधून ऋषभ पंतचा पत्ता कट? वृद्धीमान साहाला संधी
3 रोहितवर दबाव नाही, त्याला वेळ दिला जाईल – रवी शास्त्री
Just Now!
X