भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडील हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी सकाळी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे. बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बडोदा क्रिकेट असोसिएशनने मुख्य कार्यकारी आधिकारी शिशिर हटंगडी यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआयशी बोलताना शिशिर हटंगडी म्हणाले की, वैयक्तिक कारणामुळे क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या दुखात सहभागी आहोत.


सय्यद मुश्तक अली टॉफ्रीमध्ये क्रृणाल पांड्यानं तीन सामन्यात चार बळी घेतले आहेत. तसेच पहिल्या सामन्यात महत्वाची ७६ धावांची खेळीही केली होती. क्रृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोद्यानं आतापर्यत तिनही सामने जिंकले आहेत. ग्रुप सी मध्ये बडोद्याचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने सय्यद अली स्पर्धेत सहभाग घेतला नाही.आगामी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी हार्दिक पांड्या तयारी करत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krunal hardik pandyas father passes away nck
First published on: 16-01-2021 at 09:50 IST