News Flash

कृणाल पांड्याला वन-डे संघात अधिक संधी मिळायला हवी – व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

कृणाल अखेरच्या फळीत फलंदाजी करु शकतो !

भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने वन-डे क्रिकेटमध्ये कृणाल पांड्याला अधिकाधिक संधी मिळायला हवी असं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या कॉलममध्ये लक्ष्मणने आपलं मत मांडलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत कृणाल पांड्याने मालिकावीराचा किताब पटकावला आहे.

अवश्य वाचा – Ind A vs WI A : युवा शुभमन गिलचं द्विशतक, भारताची सामन्यावर पकड

“कृणाल पांड्या चाणाक्ष खेळाडू आहे. त्याला त्याची क्षमता चांगली माहिती आहे. त्याला वन-डे क्रिकेटमध्ये अधिकाधीक संधी मिळायला हवी. माझ्यामते तो सहाव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करु शकतो आणि दहा षटकांचा कोटाही पूर्ण करु शकतो.” लक्ष्मणने कृणालच्या खेळाचं कौतुक केलं. कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळाच्या आधारावर भारताने टी-२० मालिकेत ३-० ने बाजी मारली.

यावेळी लक्ष्मणने टी-२० मालिकेत बाजी मारलेल्या तरुण खेळाडूंचं कौतुक केलं. टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघासमोर आता वन-डे मालिकेचं आव्हान असणार आहे. गयाना येथील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यांत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2019 11:41 am

Web Title: krunal pandya should be given more opportunities in odis says%e2%80%89vvs%e2%80%89laxman psd 91
Next Stories
1 विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू, इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून प्रशंसा
2 Global T-20 Canada स्पर्धेत युवराज सिंहची फसवणूक
3 कुस्तीपटू बजरंग पुनिया विवाहबंधनात अडकणार
Just Now!
X