News Flash

धोनीवर अवलंबून आहे की नाही हे सांगण्याची मला गरज नाही – कुलदीप यादव

वर्षभरापासून धोनीला भारतीय संघात स्थान नाही

कुलदीप यादव

इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या स्पर्धेनंतर संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघात जागा मिळाली नाही. अनेक महिने धोनीच्या निवृत्तीविषयीच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत, परंतू धोनीने अद्याप त्याबद्दल अधिकृत निर्णय घेतलेला नाही. आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनी क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार होता, परंतू करोनामुळे आयपीएलचा हंगामही स्थगित करण्यात आला आहे. भारतीय गोलंदाजांना यष्टीमागून कोणत्या टप्प्यावर चेंडू टाक याचं मार्गदर्शन करणारा धोनी आपण सर्वांनी आतापर्यंत पाहिला आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने धोनीच्या मार्गदर्शनाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

“होय नक्कीच, धोनीने मला नेहमी मार्गदर्शन केलं आहे. कारण यष्टीरक्षकाला नेमका अंदाज असतो की कोणत्या टप्प्यावर चेंडू पडला की आपल्याला विकेट मिळेल. धोनीसारख्या अनुभवी यष्टीरक्षकाला फलंदाज कसा खेळणार आहे याची माहिती असते. हा एक सांघिक प्रकार आहे. विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीये, याचा अर्थ मला कोणालाही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नाही. मी धोनीवर अवलंबून आहे की नाही हे सांगण्याची मला गरज वाटत नाही, मी फक्त माझी गोलंदाजी कशी सुधारेल याकडे लक्ष देत असतो, कारण कितीही झालं तरी हा एक सांघिक खेळ आहे.” कुलदीप टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

लॉकडाउन काळात सध्या सर्व भारतीय क्रिकेटपटू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीसीसीआयनेही करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या काळात या स्पर्धेचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. परंतू या स्पर्धेचं आयोजन करणं कठीण असेल असा मतप्रवाह अनेकांमध्ये पहायला मिळल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाल्याचंही बोललं जातंय. आयपीएलमध्ये धोनी चेन्नईच्या संघाचं तर कुलदीप कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधीत्व करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 4:11 pm

Web Title: kuldeep yadav says dont need to say i am dependent on ms dhoni psd 91
Next Stories
1 Video : नाचोsss ….. क्रिकेटपटूने रस्त्यावरच सुरू केला डान्स
2 संधी मिळाल्यास भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायला आवडेल – मोहम्मद अझरुद्दीन
3 ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या अलिबागकरांना पृथ्वीची मदत
Just Now!
X