News Flash

ग्रँडमास्टर लेऑन मेंडोसाला जेतेपद

गोव्याच्या १५ वर्षीय मेंडोसाने या स्पर्धेत अपराजित राहताना चार विजय आणि पाच डाव बरोबरीत सोडवले.

(संग्रहित छायाचित्र)

कुमानिया बुद्धिबळ स्पर्धा

भारताचा युवा ग्रँडमास्टर लेऑन ल्युक मेंडोसा याने हंगेरी येथे झालेल्या दुसऱ्या कुमानिया बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

गोव्याच्या १५ वर्षीय मेंडोसाने या स्पर्धेत अपराजित राहताना चार विजय आणि पाच डाव बरोबरीत सोडवले. त्याने नऊ फेऱ्यांमध्ये ६.५ गुणांची कमाई केली. मेंडोसा आणि स्लोव्हाकियाचा मिलान पॅचर यांचे समान गुण झाले, पण सरस टाय-ब्रेकच्या आधारे मेंडोसाने जेतेपद प्राप्त केले.

पहिला डाव बरोबरीत सोडवल्यानंतर मेंडोसाने सलग चार विजय प्राप्त केले. त्यानंतरचे चार डाव बरोबरीत सोडवत त्याने ६.५ गुण मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:16 am

Web Title: kumania chess tournament grandmaster leon mendoza won the title abn 97
Next Stories
1 धावांच्या पावसात भारताची होरपळ!
2 IND vs ENG: स्टोक्स-बेअरस्टो ठरले इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार
3 ‘पॉवरफुल’ पंतचा पराक्रम, मोडला युवराजच्या 6 षटकारांचा विक्रम!
Just Now!
X