14 August 2020

News Flash

क्रिकेटपटूच्या गाडीची वृद्ध इसमाला धडक, उपचादारम्यान मृत्यू

२५ वर्षीय खेळाडूला अटक

संग्रहित छायाचित्र

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुसल मेंडीसला श्रीलंकन पोलिसांनी अटक केली आहे. मेंडीसच्या गाडीने ६४ वर्षीय इसमाला धडक दिली, ज्यात या वयोवृद्ध इसमाला आपले प्राण गमवावे लागले. रविवारी सकाळी कोलंबो जवळील पानादुरा भागात हा अपघात घडला. अपघातात मृत पावलेला व्यक्ती हा स्थानिक रहिवासी होता. अपघातानंतर या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याने अखरेचा श्वास घेतला.

श्रीलंकन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कुसल मेंडीसला अटक केली आहे. मेंडीस दारुच्या नशेत गाडी चालवत होता का याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. रविवारी दुपारी किंवा सोमवारी मेंडीसला मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं जाणार आहे. अपघातात मृत्यू झालेला इसम हा सायकलपटू असल्याचं कळतंय. २५ वर्षीय कुसल मेंडीस हा श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू मानला जातो. आतापर्यंत कुसलने ४४ कसोटी आणि ७६ वन-डे सामन्यात श्रीलंकेचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:57 pm

Web Title: kusal mendis arrested for running over and killing 64 year old cyclist psd 91
Next Stories
1 धोनी संघात असताना मी अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो – कुलदीप यादव
2 जगातलं तिसरं मोठं क्रिकेट मैदानही भारतात, कामाला सुरुवात
3 ..तर ‘आयपीएल’ अशक्य!
Just Now!
X