News Flash

प्रेमाच्या पिचवर आणखी एक क्रिकेटपटू ‘क्लीन बोल्ड’; साखरपुड्याचे फोटो केले शेअर

क्रिकेटच्या मैदानावरी धडाकेबाज फलंदाजाचा हा रोमँटिक अंदाज नक्की पाहा

IPL 2020 स्पर्धेत आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ठसा उमटवणारा वेस्ट इंडिजचा खेळाडू निकोलस पूरन याने मंगळवारी (१७ नोव्हेंबर) हटके अंदाजात साखरपुडा केला. दीर्घ काळाच्या रिलेशनशिपनंतर पूरनने मैत्रीण कॅथरीना मिगुएलशी साखरपुडा केल्याचा फोटो पोस्ट केला. निकोलस पूरनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून २ फोटो पोस्ट केले. कॅथरीनाला प्रपोज करताना गुडघ्यावर बसून रोमँटिक अंदाजात त्याने तिला अंगठी घातली. कॅथरीनानेही तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

निकोलस पूरनने कॅथरीना मिगुएल बरोबरचा फोटो शेअर करत लिहिले की, “कॅथरीनाची साथ म्हणजे देवाने मला दिलेला एक आशीर्वाद आहे. मी आणि कॅथरीना मिगुएल, आम्ही साखरपुडा केल्याचं जाहीर करतो. ही घोषणा करताना मला खूप आनंद होतो आहे. लव्ह यू मिग्स… अखेर तू हो म्हणालीसच”, असं कॅप्शन त्याने या पोस्टसोबत लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nicholas Pooran (@nicholaspooran)

पूरननंतर कॅथरीनानेदेखील तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले. त्या फोटोंसह तिने लिहिलं, “पूरनने सारं काही सुंदर पद्धतीने जुळवून आणलं. तू माझ्यावर प्रेम करतोस हे माझ्यासाठी वरदानच आहे. मी या गोष्टीसाठी दररोज देवाचे आभार मानते. लव्ह यू निकोलस पूरन!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Alyssa Miguel (@kathrina_miguel)

निकोलस आणि कॅथरीना IPL 2020 साठी युएईमध्ये एकत्र होते. IPLच्या वेळी कॅथरीना अनेकदा निकोलसला चिअर करताना स्टेडियममध्ये दिसली. आयपीएलमध्ये निकोलसने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दमदार कामगिरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 7:17 pm

Web Title: kxip big hitter nicolas pooran engaged to kathrina miguel romantic photos viral on social media vjb 91
Next Stories
1 शाकिब अल हसनला ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक
2 IND vs AUS VIDEO: नेट्समध्ये केएल राहुलची धडाकेबाज फलंदाजी
3 जाणून घ्या टीम इंडियाचं २०२१ चं वेळापत्रक…
Just Now!
X