18 February 2019

News Flash

2019 IPL साठी सट्टेबाजीला मान्यता द्या – प्रिती झिंटा

सट्टेबाजीला मान्यता दिल्यास अवैध प्रकारांचं प्रमाण कमी होईल - प्रिती

प्रिती झिंटा आयपीएल सामन्यादरम्यान

आयपीएमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने आयपीएलमध्ये सट्टेबाजीला मान्यता देण्याची मागणी केली आहे. मध्यंतरी आयपीएल आणि सट्टेबाजांच्या कनेक्शनच्या अनेक कहाण्या समोर आल्या होत्या. हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रिती झिंटाने ही मागणी केली आहे.

“तुम्ही किती लोकांना सट्टेबाजी करण्यापासून रोखणार आहात, त्याऐवजी आयपीएलमध्ये सट्टेबाजीला मान्यता द्या. यामुळे सरकारला महसुल चांगला मिळेल. प्रत्येक वेळा मी पकडले जाईन किंवा पकडलो जाईन या भितीने अनेक लोकं सट्टा लावत नाहीत. मात्र तुम्ही किती काळ अशा गोष्टींवर नियंत्रण ठेऊ शकाल?”

आयपीएमध्ये आतापर्यंत तुला कोणत्या सट्टेबाजाने ऑफर दिली आहे का असा प्रश्न विचारला असता प्रिती म्हणाली, “मला जर कोणी अशी ऑफर दिली असती तर त्याला मी सोडलंच नसतं. मी त्वरित त्या माणसाला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं.” सट्टेबाजीला मान्यता दिल्यास सध्या जे काही अवैध प्रकार समोर येतायत त्यांचं प्रमाण कमी होईल असं मतही प्रितीने व्यक्त केलं आहे. मध्यंतरी अरबाझ खान आणि बुकी सोनु जालान यांच्यातल्या संबंधांच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे प्रिती झिंटाने केलेल्या मागणीवर बीसीसीआय किंवा आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल काही निर्णय घेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on October 12, 2018 8:47 pm

Web Title: kxip owner preity zinta wants betting to be legalised for ipl 2019