21 October 2020

News Flash

ला लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिद, बार्सिलोनाचे पराभव

माद्रिदला कॅडिझ संघाकडून ०-१ अशी हार पत्करावी लागली.

बार्सिलोना : बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या जेतेपदासाठी आघाडीवर असणाऱ्या संघांना ला-लीगा फु टबॉलमध्ये यंदाच्या मोसमातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. रोनाल्ड कोमन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बार्सिलोनाचा शनिवारी गेटाफे ने ०-१ असा पाडाव के ला. माद्रिदला कॅडिझ संघाकडून ०-१ अशी हार पत्करावी लागली.

इंग्लिश प्रीमियर लीग : मँचेस्टर सिटी, युनायटेडचे विजय

मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनायटेड या संघांनी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये विजयाची नोंद के ली. मँचेस्टर सिटीने आर्सेनलचे आव्हान १-० असे परतवून लावले. रहिम स्टर्लिगचा (२३व्या मिनिटाला) गोल त्यांच्या विजयात मोलाचा ठरला.

सेरी-ए फुटबॉल स्पर्धा : इब्राहिमोव्हिचचे पुनरागमनात दोन गोल

करोना संकटातून सावरल्यानंतर झोकात पुनरागमन करत झ्लटान इब्राहिमोव्हिचने दोन गोल लगावले. त्याच्या या कामगिरीमुळे एसी मिलानने सेरी-ए फु टबॉल स्पर्धेत इंटर मिलानचा २-१ असा पराभव के ला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:03 am

Web Title: la liga football real madrid barcelona defeated zws 70
Next Stories
1 नव्यांना संधी महिलांपुरती!
2 डाव मांडियेला : बगलेतल्या पानांची तिहाई
3 देशांतर्गत क्रिकेट हंगाम १ जानेवारीपासून!
Just Now!
X