23 September 2020

News Flash

सेल्टा व्हिगोकडून बार्सिलोना पराभूत

ला लीगा फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात सेल्टा व्हिगोकडून ०-२ अशा पराभवाचा सामना करावा लागला.

इयागो अस्पासने गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना सेल्टा व्हिगोचे खेळाडू.

चॅम्पियन्स लीगमधील लिव्हरपूलविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील ११ खेळाडूंना बार्सिलोनाने विश्रांती दिल्यानंतर त्यांना ला लीगा फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात सेल्टा व्हिगोकडून ०-२ अशा पराभवाचा सामना करावा लागला.

लिओनेल मेसी, लुइस सुआरेझ, फिलिपे कुटिन्हो यांसारख्या अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाच्या दुसऱ्या फळीच्या संघाला आपला खेळ उंचावताच आला नाही. त्यातच औसमाने डेम्बेले याला दुखापतीमुळे पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच मैदान सोडावे लागले. डेम्बेलेच्या मांडीचे स्नायू ताणले असले तरी तो लिव्हरपूल विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल, अशी आशा बार्सिलोनाने व्यक्त केली.

गेल्या आठवडय़ात बार्सिलोनाने ला लीगाच्या विजेतेपदावर कब्जा केल्यामुळे त्यांना या पराभवाने फारसा फरक पडणार नाही. मात्र या विजयामुळे सेल्टा व्हिगोचा आत्मविश्वास उंचावला असून तळाच्या तीन संघांपेक्षा ते पाच गुणांनी आघाडीवर आहेत. मॅक्सिमिलानो गोंझालेझ (६७व्या मिनिटाला) आणि इयागो अस्पास याने (८८व्या मिनिटाला) पेनल्टीवर केलेल्या गोलाच्या बळावर सेल्टा व्हिगोने हा सामना आरामात जिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 11:23 pm

Web Title: la liga football tournament
Next Stories
1 Video : दिनेश कार्तिकने घेतलेला हा अफलातून झेल पाहिलात का?
2 Video : मलिंगाने सोडवलं ‘रसल’ कोडं; पहिल्याच चेंडूवर धाडलं माघारी
3 केदार जाधवच्या खांद्याला दुखापत, विश्वचषकाआधीच भारतीय संघाच्या अडचणींमध्ये वाढ
Just Now!
X