06 August 2020

News Flash

ला-लीगा  फुटबॉल स्पर्धा : रेयाल माद्रिदची आघाडी बळकट

रेयालने सर्व सहा सामने जिंकून गुणतालिकेत ७४ गुणांसह आघाडी घेतली आहे

बार्सिलोना : सर्जियो रामोसने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर रेयाल माद्रिदने गेटाफे संघाचे आव्हान १-० असे परतवून लावले. या विजयासह रेयाल माद्रिदने बार्सिलोनाला मागे टाकत आघाडी बळकट केली आहे. रामोसने ७९व्या मिनिटाला मिळालेल्या स्पॉट-किकवर गोल लगावला आणि रेयालचे खाते खोलले. हाच गोल  निर्णायक ठरला. त्याचा हा मोसमातील नववा गोल ठरला. रेयालने सर्व सहा सामने जिंकून गुणतालिकेत ७४ गुणांसह आघाडी घेतली आहे. बार्सिलोना मात्र ७० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. बार्सिलोनाला चार सामन्यांमध्ये तिसऱ्यांदा बरोबरी पत्करावी लागली.

लिव्हरपूलची मँचेस्टर सिटीवर मात

मँचेस्टर : इंग्लिश प्रीमियर लीगचे जेतेपद सात सामन्यांआधीच पटकावल्यानंतर लिव्हरपूलने मँचेस्टर सिटीचा ४-० असा धुव्वा उडवला. केव्हिड डी ब्रूयने (२५व्या मिनिटाला), रहिम स्टर्लिग (३५व्या मिनिटाला) आणि फिल फोडेन (४५व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 2:54 am

Web Title: la liga ramos penalty sends real madrid four points clear zws 70
Next Stories
1 माजी बॉक्सिंगपटू डिंको सिंग करोनामुक्त
2 २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर संशय घेण्याचं कारण नाही – आयसीसी
3 भारताने जिंकलेला World Cup फिक्स होता? श्रीलंकन पोलिसांनी दिलं उत्तर
Just Now!
X