प्रो कबड्डी लीगचे थेट प्रक्षेपण केले जात असल्यामुळे या सामन्यांमध्ये काम करणाऱ्या पंचांची कामगिरी अचूक असणे अपेक्षित आहे. मात्र अनेक वेळा मैदानावरील पंचांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळेच येथे दररोज भारतीय कबड्डी महासंघाच्या तांत्रिक समितीचे प्रमुख ई. प्रसाद राव हे स्वत: सर्व पंचांची उजळणी घेत आहेत.

या लीगमधील बरेचसे सामने शेवटच्या चढाईपर्यंत चुरशीने खेळले जात असल्यामुळे पंचांकडून नकळत झालेला चुकीचा निर्णय सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. त्यामुळेच येथे काही निर्णयांवरून खेळाडूंसह प्रशिक्षकांमध्येही नाराजी दिसून येत आहे. त्यांनी आपले गाऱ्हाणे प्रसाद राव यांच्या कानी घातले असल्याचे समजते.

two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
Pune Police Big Decision On Transgender
पुणे: ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?
student preparing for JEE exam
झोपण्यासाठी फक्त ४ तास, JEE परिक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे वेळापत्रक पाहून जेईईच्या उमेदवारांना धक्का बसेल

बोनस गुण, बाजूच्या रेषेला पाय लागण्याच्या घटना आदीबाबत गुण देण्यावरून पंच व प्रमुख पंच यांच्यामध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. एकाच सामन्यात संघातील खेळाडू मैदानावर मोठय़ाने बोलत असतील तर त्या खेळाडूंना ताकीद दिली जाते. याबाबतही पक्षपातीपणा दिसून येत आहे. काही विशिष्ट खेळाडूंना याबाबत लक्ष्य केले जात आहे. काही वेळा चढाई करणाऱ्या जर्सी ओढल्याबद्दल पकड करणाऱ्या खेळाडूला बाद ठरवले जात आहे. वास्तविक प्रत्येक वेळी कोणताही खेळाडू जाणीवपूर्वक चढाई करणाऱ्याची जर्सी ओढत नसतो. बहुतांश वेळी नकळत जर्सी हातात येते. याबाबतही अनेक खेळाडू व प्रशिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. असा निर्णय देताना पंचांनी निर्णयाचे पुनरावलोकन करावे, असेच मत काही खेळाडूंनी व्यक्त केले.

सामना सुरू असताना संघांबरोबर असलेल्या साहाय्यक पंचांकडून ‘विसावा’ची (टाइम आऊट) खूण झाली असतानाही खेळाडूला चढाई करण्यासाठी पाठवले जाण्याचे प्रसंग पाहायला मिळाले. एवढेच नव्हे ‘विसावा’ मागणारे खेळाडू गाफील असताना त्यांना बाद केल्यास पंचांकडूनही त्याला बाद ठरवण्याच्या घटना घडल्या आहेत.

बहुतांश पंच भारतीय कबड्डी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मत व्यक्त करणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच आहे, अशी प्रतिक्रिया एक-दोन प्रशिक्षकांनी व्यक्त केली.