भारताच्या लक्ष्य सेनने चौथ्या मानांकित इख्सान लिओनाडरे इमान्युएल रुम्बेचा (इंडोनेशिया) पराभव करून जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेची अंतिम फेरी गाठली आहे.

सहाव्या मानांकित लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित लि शिफेंगवर धक्कादायक विजय मिळवत सर्वाचे लक्ष वेधले होते. शनिवारी लक्ष्यने रुम्बेचा २१-७, २१-१४ असा पराभव केला. त्यामुळे भारताला आशियाई कनिष्ठ स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपदाची संधी आहे. रविवारी इंडोनेशियाचा अग्रमानांकित कुनलाव्हूट वितिदसरणशी त्याची जेतेपदाच्या लढतीत गाठ पडणार आहे. वितिदसरणने उपांत्य फेरीत चीनच्या युपेंग बायचा २१-१४, २१-१२ असा पराभव केला.