News Flash

लक्ष्यची सारलॉलक्स स्पर्धेतून माघार

प्रशिक्षक तसेच वडील डी. के. सेन यांना करोनाची लागण झाल्यामुळे लक्ष्यने माघारीचा निर्णय घेतला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

गतविजेत्या लक्ष्य सेनने वैयक्तिक कारणास्तव सारलॉलक्स बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. प्रशिक्षक तसेच वडील डी. के. सेन यांना करोनाची लागण झाल्यामुळे लक्ष्यने माघारीचा निर्णय घेतला आहे.

तो म्हणाला, ‘‘सोमवारी करोना चाचणी घेण्यात आल्यावर माझा अहवाल  नकारात्मक आला असला तरी वडीलांना करोनाची बाधा झाली आहे. गेले काही दिवस मी त्यांच्या सहवासात असल्याने माघार घेत आहे.’’

मालविका पराभूत

भारताच्या मालविका बनसोडला सारलॉलक्स बॅडमिंटन स्पर्धेत सलामीलाच पराभव पत्करावा लागला.  इस्टोनियाच्या क्रिस्तिन क्युबाने तिला १२-२१, १९-२१ असे हरवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 12:20 am

Web Title: lakshya withdraws from sarlolax competition abn 97
Next Stories
1 RCB विरुद्ध सूर्यकुमारच्या खेळीने प्रभावित झाले शास्त्री गुरुजी, म्हणाले संयम ठेव…!
2 मांजरेकर मुंबईच्या पुढे विचार करु शकत नाही ! राहुलच्या निवडीवरुन माजी खेळाडूंमध्ये जुंपली
3 IND vs AUS: “…तर तुम्हाला रोहित शर्माला संघात घ्यावंच लागेल”
Just Now!
X