19 January 2020

News Flash

भारताकडे विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज!

माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचे मत

माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचे मत

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेली गोलंदाजांची फळी ही इतर संघांच्या तुलनेत सर्वोत्तम असल्यामुळेच भारताला पुन्हा एकदा जगज्जेतेपद मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे, अशी स्तुतिसुमने माजी भारतीय क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी रविवारी व्यक्त केली.

३० मेपासून इंग्लंड येथे सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी अशा दमदार वेगवान त्रिकुटाचा समावेश असून त्यांना हार्दिक पंडय़ा आणि विजय शंकर या अष्टपैलू खेळाडूंचीदेखील साथ लाभेल. त्याशिवाय कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल आणि रवींद्र जडेजा असे फिरकी त्रिकूटही भारताकडे आहे.

‘‘यंदाच्या विश्वचषकात भारतीय वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट दमदार कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. किंबहुना आपली गोलंदाजांची फळी इतर संघांपेक्षा अधिक बळकट वाटते. त्याशिवाय आपल्याकडे उपलब्ध असलेली अष्टपैलूंची जोडीही प्रतिभावान असल्यामुळे विराट कोहलीचा संघ विश्वचषक उंचावण्यासाठी प्रबळ दावेदार आहे,’’ असे राजपूत म्हणाले.

राजपूत सध्या मुंबईत सुरू असलेल्या मुंबई प्रीमियर ट्वेन्टी-२० लीग क्रिकेटमध्ये ट्रिम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट या संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत.

‘‘२०११च्या भारतीय संघात आपली सर्वाधिक मदार आघाडीच्या तीन फलंदाजांवर होती. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी जवळपास प्रत्येक सामन्यात भारताला सुरेख सुरुवात करून दिली. त्याचप्रमाणे यंदा कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर भारताची भिस्त असून त्यांना महेंद्रसिंह धोनीसारख्या फलंदाजाचीसुद्धा साथ लाभेल. हार्दिकही गेल्या वर्षभरात खेळाडू म्हणून अधिक प्रगल्भ झाला असल्यामुळे भारताचा संघ परिपूर्ण असून त्यांना नमवणे आव्हानात्मक राहील,’’ असे राजपूत यांनी २०११च्या विश्वविजेत्या संघाशी सध्याच्या खेळाडूंशी तुलना करण्यास विचारले असता सांगितले. विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी रंगणार आहे.

First Published on May 20, 2019 12:24 am

Web Title: lalchand rajput about india cricket
Next Stories
1 विराट ध्येयासक्ती!
2 ट्रेनिंग विसरा, आराम करा ! विश्वचषकासाठी BCCI चा टीम इंडियाला सल्ला
3 विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळणं ही मानाची गोष्ट – भुवनेश्वर कुमार
Just Now!
X