10 April 2020

News Flash

कोलकाता मिनी मॅरेथॉनमध्ये जैशा, ललिता व सुधा सहभागी

बीजिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये जैशा व सुधा यांनी पहिल्या २० क्रमांकांमध्ये स्थान मिळवले होते.

ललिता बाबर

आंतरराष्ट्रीय धावपटू ओ.पी.जैशा, ललिता बाबर व सुधा सिंग यांनी कोलकाता येथे २० डिसेंबरला होणाऱ्या २५ किलोमीटर अंतराच्या मिनीमॅरेथॉन शर्यतीत सहभाग निश्चित केला आहे. बीजिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये जैशा व सुधा यांनी पहिल्या २० क्रमांकांमध्ये स्थान मिळवले होते. जैशाने यंदा मुंबई मॅरेथॉन शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. ललिताच्या नावावर तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीमधील राष्ट्रीय विक्रम आहे. पुरुष गटात वसई-विरार मॅरेथॉन शर्यतीमधील माजी विजेता एलामसिंग व सेनादलाचा सनातोन सिंग यांच्यावर भारताची मदार आहे. सनातोन सिंग याने यंदा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 7:57 am

Web Title: lalita participate in marathon
Next Stories
1 विश्वनाथन आनंदचा धक्कादायक पराभव
2 रिओ ऑलिम्पिकसाठी सानिया-बोपण्णा एकत्र?
3 विकास गौडासह तिघे ऑलिम्पिकसाठी पात्र
Just Now!
X