सायकलिंगमधील आपल्यावरील उत्तेजकांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अमेरिकन उत्तेजकविरोधी संस्थेला (यूएसएडीए) सहकार्य करण्यास विख्यात सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगने नकार दिला आहे. मात्र अन्य उत्तेजकांच्या चौकशीविषयी मदत करण्यासाठी त्याने होकार दर्शवला आहे.
‘‘निवडक खेळाडूंच्या चौकशी प्रक्रियेत आर्मस्ट्राँग बऱ्याच कारणांमुळे यूएसएडीएला सहकार्य करू शकत नाही. ९५ टक्क्यांपेक्षा जास्त खेळ यूएसएडीएच्या अखत्यारित येत नाहीत,’’ असे आर्मस्ट्राँगने म्हटले आहे. ‘‘आता आर्मस्ट्राँगशिवायच आम्ही केलेल्या चौकशीच्या आधारे पुढे जाणार आहोत,’’ असे यूएसएडीएचे मुख्य कार्यकारी ट्रेव्हिस ट्रायगार्ट यांनी स्पष्ट केले.