News Flash

माजी आफ्रिकन खेळाडू करणार अफगाणिस्तानच्या संघाला मार्गदर्शन

अफगाण क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू लान्स क्लुजनरची अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. अफगाणिस्तानचे माजी प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी राजीनामा दिल्यानंतर अफगाण क्रिकेट बोर्डाने नवीन अर्ज मागवले होते. तब्बल ५० जणांनी या जागेसाठी अर्ज केले होते, ज्यामधून लान्स क्लुजनरची निवड करण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. प्रशिक्षक म्हणून क्लुजनरची ही पहिली परीक्षा असणार आहे. “क्लुजनर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा आमच्या खेळाडूंना नक्कीच फायदा होईल.” अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने क्लुजनरचं स्वागत केलं आहे.

लान्स क्लुजनर सांभाळणार अफगाणिस्तानचं प्रशिक्षकपद

 

क्लुजनरनेही आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल आभार मानले आहेत. “सध्याच्या घडीला अफगाणिस्तानचा संघ हा सर्वात तरुण आणि उमद्या खेळाडूंचा संघ आहे. अशा खेळाडूंसोबत काम करायला मला नक्की आवडेल. योग्य मेहनत घेतली तर अफगाणिस्तानचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्की यशस्वी होईल.” याआधी क्लुजनरने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टी-२० संघांना मार्गदर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 5:59 pm

Web Title: lance klusener named head coach of afghanistan psd 91
Next Stories
1 खेळाडू चुकत असेल तर मी बोलणारच ! तबला वाजवायला संघात आलोय का?
2 Korea Open : कश्यपची उपांत्य फेरीत धडक
3 …..म्हणून महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात नाही, जाणून घ्या कारण !
Just Now!
X