ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी श्रीलंकेने १५ सदस्यीय संघ जाहीर केला असून दुखापतींनी वेढलेल्या लसिथ मलिंगाचा समावेश करण्यात आला आहे, मात्र तंदुरुस्त असल्यासच तो खेळू शकेल. मलिंगाच्या घोटय़ावर सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो खेळू शकला नाही.  त्याचबरोबर संशयास्पद शैलीच्या आरोपातून मुक्त झालेला फिरकीपटू सचित्र सेनानायकेला या संघात संधी मिळाली आहे.
संघ : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, लहिरू थिरिमाने, दिनेश चंडिमल, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, धम्मिका प्रसाद, नुवान कुलसेकरा, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, दिमुथ करुणारत्ने.