31 October 2020

News Flash

मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू म्हणतो २०१९चा वर्ल्ड कप माझ्यासाठी शेवटचा…

'जर मला संघात स्थान मिळाले, तरच मी ही स्पर्धा खेळू शकेन'

इंग्लंड आणि वेल्स मध्ये २०१९ ला होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आता प्रत्येक संघाने आपली तयारी करण्यास सुरुवात केली आहे. या स्पर्धेत आपला सर्वोत्तम संघ उतरवण्याच्या उद्देशाने प्रत्येक संघ व्यवस्थापन प्रयोग करून पाहत आहेत. यानुसार आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवणार आहे. पण या दरम्यान फलंदाजांचा कर्दनकाळ असलेला लसिथ मलिंगा याने हा विश्वचषक आपला शेवटचा विश्वचषक असल्याचे म्हटले आहे.

 

मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप उमटवली आहे. त्याने आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्ससाठी अत्युच्च दर्जाची गोलंदाजी करून अनेक सामने जिंकवून दिले आहेत. सध्या तो मुंबई इंडियन्सचा मेंटॉर म्हणून जरी कार्यरत असला, तरी श्रीलंकेच्या संघात तो अजूनही उत्तम कामगिरी करत आहे. पण गेल्या काही महिन्यात त्याला श्रीलंकेच्या संघातून वगळण्यात आले होते.

या सर्व बाबतीत बोलताना मलिंगा म्हणाला की २०१९ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ही माझ्यासाठी शेवटची विश्वचषक स्पर्धा असेल. गेल्या काही महिन्यात निवतकर्त्यांनी घेतलेले निर्णय पाहता मला या स्पर्धेसाठी संधी मिळेल असे वाटत नाही. पण ‘जर मला संघात स्थान मिळाले, तरच मी ही स्पर्धा खेळू शकेन, असे तो म्हणाला.

संघ निवड समिती ही अंतिम संघ ठरवते. मी केवळ एक खेळाडू आहे. मला संधी मिळाली की माझा सर्वोत्तम खेळ करून दाखवणे हे माझे काम आहे. मला जेव्हा आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले नव्हते, त्यावेळी कॅनडाच्या लीग मध्ये खेळलो. इतरही स्थानिक स्तराच्या स्पर्धांमध्ये खेळलो आणि सर्वाधिक बळी टिपून दाखवले. त्याच जोरावर मला पुन्हा श्रीलंकेच्या संघात स्थान मिळाले. यापुढेही संधी मिळाली तर मी विश्वचषक स्पर्धा खेळेन, असेही तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 11:58 am

Web Title: lasith malinga says 2019 is my last odi world cup
टॅग Ipl,Lasith Malinga
Next Stories
1 VIDEO : अन् चाहत्याने मैदानावर रोहितचे धरले पाय
2 IND vs WI : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश यादव शर्यतीत – विराट
3 भारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न!
Just Now!
X