News Flash

निवृत्तीच्या निर्णयावरून मलिंगाचा ‘यु-टर्न’, म्हणाला…

टी २० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता

आपल्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेच्या यशात अनेकदा मानकरी ठरलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा २६ जुलै २०१९ ला बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण टी २० विश्वचषक २०२० या स्पर्धेनंतर मलिंगा टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे असे त्याने सांगितले होते. त्या निवृत्तीच्या निर्णयावर मलिंगाने ‘यु-टर्न’ घेतला आहे.

Video : भावाचा झेल घेताना चेंडू नाकावर आदळला, फिल्डर रक्तबंबाळ

 

“टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा होण्याची मी वाट पाहतो आहे. मला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की टी २० विश्वचषकासाठी मी संघाचे नेतृत्व करेन. पण श्रीलंकेत काहीही होऊ शकते. टी २० क्रिकेटमध्ये केवळ ४ षटके टाकायची असतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी टी २० दीर्घकाळ खेळू शकतो. कर्णधार म्हणून मी जगभरात इतके टी २० सामने खेळले आहेत की मी अजून दोन वर्षे सहज टी २० क्रिकेट खेळू शकेन”, असे सांगत मलिंगाने निवृत्तीचा निर्णय लांबणीवर ढकलला.

IND vs BAN : दिवस-रात्र कसोटीआधी टीम इंडियासाठी ‘गुड-न्यूज’

“सध्या श्रीलंका क्रिकेटसाठी खूप कठीण काळ सुरू आहे. श्रीलंका संघाला स्थिर नेतृत्वाची गरज आहे. श्रीलंकेकडे सध्या चांगले आणि प्रतिभावान गोलंदाज नाहीत. श्रीलंकेचा संघ चांगली कामगिरी करण्यात कमी पडत आहे. पूर्णपणे नव्याने संघबांधणी करण्यासाठी आम्हाला किमान दीड वर्षाचा अवधी लागेल, पण तोपर्यंत धीर धरावा लागेल. मी संघात असताना युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची माझ्याकडे संधी आहे. मी निवृत्त झालो तर मला तसे करता येणार नाही”,असेही मलिंगाने सांगितले.

दरम्यान, लसिथ मलिंगाने जुलै २०१९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या १५ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीची सांगता केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 1:32 pm

Web Title: lasith malinga takes u turn on t20 cricket retirement says want to play for two more years vjb 91
Next Stories
1 Video : ‘टीम इंडिया’ कोलकातामध्ये दाखल, पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत
2 IND vs BAN : “केवळ खेळाडूच नव्हे, पंचांनाही सरावाची गरज”
3 IND vs BAN : दिवस-रात्र कसोटीआधी टीम इंडियासाठी ‘गुड-न्यूज’
Just Now!
X