News Flash

देशाबद्दलच्या एकनिष्ठतेवर शंका घेतली म्हणून दुखावलो – मोहम्मद शमी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला.

गोलंदाज मोहम्मद शामी

हसीन जहाँने भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतर स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा माझ्यामध्ये आत्मविश्वास होता असे मोहम्मद शमीने गुरुवारी सांगितले. बीसीसीआयने शमीला भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपातून दोषमुक्त ठरवल्यामुळे आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख नीरज कुमार यांनी आठवडयाभराच्या तपासानंतर शमीला क्लीनचीट दिली आहे.

शमीवर अलिश्बा नावाच्या पाकिस्तानी महिलेकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला होता. शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मी प्रचंड दबावाखाली होतो पण आता बीसीसीआयने क्लीनचीट दिल्यामुळे मी चिंतामुक्त आहे. माझी देशाबद्दलची कटिबद्धता आणि प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे मी दुखावलो होतो. पण माझा बीसीसीआयच्या चौकशी समितीवर विश्वास होता. आता माझ्या मनात पुन्हा मैदानावर परतण्याचा विचार सुरु आहे असे शमीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मागचे दोन आठवडे माझ्यासाठी अत्यंत कठिण होते असे शमी म्हणाला. मागच्या दहा-पंधरा दिवसात मी खूप काही सहन केले आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे मी प्रचंड दबावाखाली होतो असे शमीने सांगितले. बीसीसीआयने शमीला मॅच फिक्सिंगच्या आरोपातून मुक्त केले आहे तसेच खेळाडूंबरोबर जे वार्षिक करार केले आहेत त्यामध्ये शमीचा ब गटात समावेश करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी शमीला बीसीसीआयकडून तीन कोटी रुपये मिळतील.

येत्या ७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतही शमीचा दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. शमी दक्षिण आफ्रिकेवरुन परतताना दुबईमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने एका पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेतले असा आरोप हसीन जहाँने केला होता. शमी मॅच फिक्सिंग करत असल्याचा आरोपही तिने केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 10:23 pm

Web Title: last 10 15 days are tough for me mohammed shami
टॅग : Mohammed Shami
Next Stories
1 मॅच फिक्सिंगच्या आरोपात मोहम्मद शमीला क्लीनचीट, BCCI कडून ग्रेड बी कॉन्ट्रॅक्टची ऑफर
2 तो हार्दिक पांड्या नव्हेच! आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरणात नवी माहिती
3 भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरोधात पराभूत
Just Now!
X