England vs India 2nd Test : क्रिकेटची पंढरी असेलल्या लॉर्ड्सवर आजपासून भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटीला सुरूवात होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. विराटसेना कामगिरीत सुधारणा करत दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.

भारताने लॉर्ड्सवर १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने अवघ्या दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. यामध्ये १९८६ मध्ये पहिला तर दुसरा विजय २०१४ मध्ये मिळवलेला आहे. येथे भारताला ११ लढतीत पराभाचा सामना करावा लागला आहे. तर चार सामने बरोबरीत सुटलेत. या मैदानारील भारतासाठी एक चांगली बाब म्हणजे गेल्या सात वर्षापासून एकाही आशियाई संघाचा लॉर्ड्सवर पराभव झाला नाही. २०११ नंतर लॉर्ड्सवर झालेल्या पाच सामन्यापैकी तीनमध्ये पराभव झाला आहे. तर दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत. या मैदानावर २०११मध्ये आशिया संघाचा अखेरचा पराभव झाला आहे.

  • २०११ : इंग्लंडने भारताचा १९६ धावांनी पराभव केला.
  • २०१४ : श्रीलंका-इंग्लंड सामना अनिर्णित राहिला.
  • २०१४ : भारताने इंग्लंडचा ९५ धावाांनी पराभव केला.
  • २०१६ : श्रीलंका-इंग्लंड सामना अनिर्णित राहिला.
  • २०१६ : पाकिस्तानने इंग्लंडचा ७५ धावाांनी पराभव केला.
  • २०१८ : पाकिस्तानने इंग्लंडचा ९ गड्यांनी पराभव केला.