05 April 2020

News Flash

BCCI च्या निवड समिती सदस्यासाठी तीन जणांमध्ये शर्यत

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचं नाव आघाडीवर

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय संघाचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. शिवरामकृष्णन यांच्यासोबत माजी फिरकीपटू राजेश चौहान आणि डावखुरे फलंदाज अमय युरासिया यांनीही आपला अर्ज दाखल केल्याचं समजतंय. एम.एस.के. प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दोन जागांसाठी आपला अर्ज दाखल करण्यासाठी २४ जानेवारी ही अखेरची तारीख होती. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, तिन्ही उमेदवारांमध्ये शिवरामकृष्णन यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी जाण्याची शक्यता आहे.

एम.एस.के. प्रसाद आणि गगन खोडा यांच्याव्यतिरीक्त शरणदीप सिंह, जतीन परांजपे आणि देवांग गांधी हे ३ सदस्य निवड समितीवर काम पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हे देखील निवड समिती सदस्यासाठी शर्यतीत होते, मात्र त्यांचं नाव अखेरच्या टप्प्यात मागे पडलं. त्यामुळे आगामी काळात कोणाच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 1:27 pm

Web Title: laxman sivaramakrishnan among three to apply for national selectors post psd 91
Next Stories
1 IPL 2020 : रॉब कॅसल राजस्थान रॉयल्सचे नवीन जलदगती गोलंदाजी प्रशिक्षक
2 Ind vs NZ : परदेश दौऱ्याची विजयी सुरुवात, ६ गडी राखत भारताची बाजी
3 भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका : संघबांधणीचे प्रयोग सुरूच!
Just Now!
X