‘कॅप्टन कोहली’च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२० या वर्षाची सुरुवात मालिका विजयाने केली. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७८ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय ठरला.

IND vs SL : हे आहेत ‘टीम इंडिया’च्या विजयाचे शिल्पकार…

भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेची धुलाई केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही टिच्चून मारा केला. त्यामुळे श्रीलंकेला तब्बल ७८ धावा कमी पडल्या. सामन्यात एक भन्नाट प्रसंग घडला. जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना श्रीलंकन फलंदाज खेळत होता. बुमराहने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या डाव्या मांडीवर आदळला. त्यामुळे बुमराहने LBW चे अपील केले. पण पंचांनी त्याला नाबाद ठरवले. हा गोंधळ सुरू असतानाच एक चोरटी धाव घेण्याची श्रीलंकन फलंदाजांना इच्छा झाली. पण ते धाव घेत असतानाच मनीष पांडेने ओशादा फर्नांडोला धावबाद केले.

पाहा व्हिडीओ –

तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ ठरला वरचढ

भारताने प्रथम फलंदाजी करत २०१ धावा केल्या आणि श्रीलंकेला २०२ धावांचे आव्हान दिले. दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिले ४ फलंदाज अवघ्या २६ धावांत माघारी परतले. यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि डी-सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. भारताकडून नवदीप सैनीने ३, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेतला.

Video : सुपर यॉर्कर! सैनीने उडवला फलंदाजाचा भन्नाट त्रिफळा

त्याआधी, सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांची अर्धशतके तर मधल्या फळीत विराट कोहली, शार्दुल ठाकूर आणि मनिष पांडे यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २०१ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून संदकनने ३ तर लहिरु कुमारा आणि डी-सिल्वाने १-१ बळी घेतला.