News Flash

स्टोक्समध्ये कोहलीप्रमाणेच नेतृत्वगुण -हुसैन

स्टोक्सच्या खांद्यांवर इतक्या लवकर पूर्णवेळ कर्णधाराची जबाबदारी सोपवू नये

संग्रहित छायाचित्र

 

इंग्लंडच्या बेन स्टोक्समध्ये भारताच्या विराट कोहलीप्रमाणेच नेतृत्वगुण असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तो कर्णधार म्हणूनही नक्कीच छाप पाडेल, असे मत माजी क्रिकेटपटू नासिर हुसैन यांनी व्यक्त केले.

८ जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ होणार असून जो रूटच्या अनुपस्थितीत स्टोक्स इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे. ‘‘ज्याप्रमाणे कोहली संघाचे नेतृत्व करताना स्वत:ला पूर्णपणे झोकून देतो, त्याचप्रमाणे स्टोक्ससुद्धा ध्येय साध्य करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. कोहलीप्रमाणेच स्टोक्सची विचारसरणी आणि देहबोली आक्रमक स्वरूपाची असून अखेरच्या क्षणापर्यंत झटण्याची क्षमता त्याच्यात आहे,’’ असे हुसैन म्हणाले. परंतु स्टोक्सच्या खांद्यांवर इतक्या लवकर पूर्णवेळ कर्णधाराची जबाबदारी सोपवू नये, असेही हुसैन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:03 am

Web Title: leadership like kohli in ben stokes abn 97
Next Stories
1 ट्वेन्टी-२० क्रिकेट काळाची गरज!
2 कोहलीवर ठपका!
3 जर्मन चषक फुटबॉल स्पर्धा : बायर्न म्युनिकचे विक्रमी विजेतेपद
Just Now!
X