05 July 2020

News Flash

पेसला विश्वविक्रमाची संधी!

चीनविरुद्ध झुंज द्यावी लागणार आहे.

लिएँडर पेस (संग्रहीत छायाचित्र)

टेनिसपटू लिएण्डर पेसला डेव्हिस चषक स्पर्धेत दुहेरीतील सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम खुणावत आहे. जागतिक संघाच्या प्ले-ऑफमध्ये धडक मारण्याच्या निर्धाराने भारताला शुक्रवारपासून चीनविरुद्ध झुंज द्यावी लागणार आहे.

४४ वर्षीय पेसच्या खात्यावर डेव्हिस चषक दुहेरीतील ४२ विजय जमा आहेत. इटलीच्या निकोला पित्रांगेलीनेही इतकेच विजय मिळवले आहेत. त्यामुळे रोहन बोपण्णासह खेळणाऱ्या पेसने आणख एक सामना जिंकल्यास तो डेव्हिस चषकातील सर्वात यशस्वी दुहेरी खेळाडू म्हणून ओळखला जाईल. याआधी पुण्यात फेब्रुवारी २०१७मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पेसला हा विश्वविक्रम करण्याची संधी होती. मात्र त्या सामन्यात पराभव झाल्याने ही संधी हुकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2018 3:07 am

Web Title: leander paes 6
Next Stories
1 बंदीविरोधात दाद न मागण्याचा वॉर्नरचा निर्णय
2 लिव्हरपूलचे मँचेस्टर सिटीवर वर्चस्व
3 फुटबॉलचे सुपरस्टार्स अवतरणार क्रीडा पंढरीत
Just Now!
X