News Flash

पेसची वर्षांतील दुसऱ्या विजेतेपदास गवसणी

अनुभवाच्या बळावर आपण आजही अनेक स्पर्धामध्ये युवकांना हेवा वाटेल, अशी कामगिरी करू शकतो.

लिएण्डर पेस (डावीकडे) व त्याचा सहकारी मिगुएल अँजेल.

अनुभवाच्या बळावर आपण आजही अनेक स्पर्धामध्ये युवकांना हेवा वाटेल, अशी कामगिरी करू शकतो, हे भारतीय टेनिसपटू लिएण्डर पेसने रविवारी पुन्हा सिद्ध केले. मेक्सिकन सहकारी मिगुएल अँजेल रेईस व्हॅरेलासह पेसने सँटो डोमिंगो खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. पेसचे हे वर्षांतील दुसरे विजेतेपद ठरले.

एक तास व २६ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात द्वितीय मानांकित मिगुएल-पेस जोडीने एरियल बेहार व रॉबटरे क्विरोझ यांच्यावर ४-६, ६-३, १०-५ असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत ६९व्या स्थानावर असणाऱ्या पेस आणि मिगुएलच्या जोडीला गेल्या आठवडय़ात माँटेरे चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. न्यूपोर्ट खुल्या टेनिस स्पर्धेत मिळवलेले विजेतेपद पेसचे वर्षांतील पहिले विजेतेपद होते.

याशिवाय पेसने या वर्षी शिकागो, डलास चॅलेंजर टेनिस स्पर्धा, विन्स्टन सालेम खुली टेनिस स्पर्धा, दुबई फ्री टेनिस अिजक्यपद स्पर्धा यांसारख्या अनेक स्पर्धामध्ये मिश्र व पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीमध्येही प्रवेश मिळवला होता, पण प्रत्येक वेळी त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:17 am

Web Title: leander paes 7
Next Stories
1 हर्षदाचा दुहेरी सुवर्णवेध
2 OMG! सलग सहा षटकारांसह १२ चेंडूत झळकावले अर्धशतक
3 Pro Kabaddi Season 6 : हरयाणाच्या पराभवाची मालिका सुरुच, पुणेरी पलटणने केली मात
Just Now!
X