News Flash

पेस-स्टेपानेकची विजयी सलामी एटीपी जागतिक टेनिस स्पर्धा

भारताच्या लिअँडर पेस याने राडेक स्टेपानेक याच्या साथीत एटीपी जागतिक टेनिस स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. त्यांनी

| November 6, 2013 05:44 am

भारताच्या लिअँडर पेस याने राडेक स्टेपानेक याच्या साथीत एटीपी जागतिक टेनिस स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. त्यांनी द्वितीय मानांकित अॅलेक्झांडर पेया व ब्रुनो सोरेझ यांच्यावर ६-३, ५-७, १०-८ अशी मात केली.
पावणे दोन तास चाललेल्या या लढतीत अमेरिकन खुली स्पर्धा विजेत्या पेस व स्टेपानेक यांनी जिद्दीने खेळ करीत विजयश्री खेचून आणली. त्यांनी पहिल्या सेटमध्ये सव्र्हिसब्रेक मिळविताना परतीचे सुरेख फटके मारले. दुसऱ्या सेटमध्ये त्यांची सव्र्हिस गमावली. हा सेट त्यांनी गमावल्यामुळे तिसरा सेट सुपर टायब्रेकरद्वारा घेण्यात आला. त्यामध्ये पेस व स्टेपानेक यांनी फोरहँडचे खणखणीत फटके व नेटजवळून प्लेसिंग असा बहारदार खेळ केला आणि सामनाजिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 5:44 am

Web Title: leander paes radek stepanek make winning start at atp world
Next Stories
1 बहरीन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : जेतेपदांवर भारतीयांचे वर्चस्व
2 चॅपेल वादावेळी सचिन माझ्या पाठीशी होता- गांगुली
3 विराट कोहली @25
Just Now!
X