27 November 2020

News Flash

पेस-स्टेपानेक अंतिम फेरीत

खेळण्याची, जिंकण्याची जिद्द काय चमत्कार घडवू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे लिएण्डर पेस. गेली अनेक वर्षे दुहेरी प्रकारात भारताचे यशस्वी नेतृत्व

| September 7, 2013 02:45 am

खेळण्याची, जिंकण्याची जिद्द काय चमत्कार घडवू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे लिएण्डर पेस. गेली अनेक वर्षे दुहेरी प्रकारात भारताचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या लिएण्डर पेसने गुरुवारी शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. पेसने चेक प्रजासत्ताकचा साथीदार राडेक स्टेपानेकच्या साथीने खेळताना अमेरिकेच्या दिग्गज ब्रायन बंधूंवर मात केली. वर्षांतील चारही ग्रँडस्लॅम स्पर्धाची जेतेपदे नावावर करण्याची अनोखी संधी ब्रायन बंधूंकडे होती. सर्व प्रकारच्या कोर्ट्सवर प्रभुत्व गाजवणाऱ्या ब्रायन बंधूंना त्यांच्याच घरच्या मैदानात रोखणे खडतर आव्हान होते, मात्र पेसने ही किमया करून दाखवली आहे. चौथ्या मानांकित पेस-स्टेपानेक जोडीने अव्वल मानांकित आणि जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या ब्रायन बंधूंवर ३-६, ६-३, ६-४ अशी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:45 am

Web Title: leander paes radek stepanek topple top seeds bryan brothers at us open
Next Stories
1 जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी सुशील कुमारचे पुनरागमन
2 भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीला आशियाई समितीची मान्यता
3 श्रीनिवासन यांच्या जागी मी असतो तर राजीनामा दिला नसता! – शास्त्री
Just Now!
X