25 February 2021

News Flash

दुहेरीत बोपण्णाच्या साथीला पेसला खेळवण्याचा निर्णय

चीनविरुद्धच्या लढतीद्वारे पेसला जागतिक विक्रम करण्याची संधी मिळणार आहे.

| March 12, 2018 03:40 am

(संग्रहित छायाचित्र)

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा

लिएण्डर पेसच्या साथीने खेळण्यासाठी रोहन बोपण्णा अनुत्सुक असला तरीही निवड प्रक्रियेत कोणत्याही खेळाडूचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, हे अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने सिद्ध केले. चीनविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी भारतीय संघात बोपण्णाच्या साथीला पेसलाच दुहेरीकरिता निवडले आहे.

अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने रविवारी भारतीय संघाची निवड जाहीर केली. एकेरीत युकी भांब्री, रामकुमार रामनाथन, सुमित नागल यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली आहे. बोपण्णा व पेस यांना दुहेरीत स्थान देताना डावखुरा खेळाडू दिविज शरणला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. कॅनडाविरुद्ध झालेल्या जागतिक प्ले-ऑफ गटाच्या सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या पुरव राजा याला अपेक्षेप्रमाणे संघातून वगळण्यात आले आहे.

चीनविरुद्धच्या लढतीद्वारे पेसला जागतिक विक्रम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा विक्रम पूर्ण होण्यासाठी बोपण्णाने या लढतीमधून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे, असे भारतीय संघाचा न खेळणारा कर्णधार महेश भूपतीने संघटनेला कळवले आहे. मात्र पेसच्या साथीने खेळण्याची बोपण्णाची तयारी नसल्यामुळेच त्याने माघार घेण्याचे ठरवले असल्याचे समजते. परंतु बोपण्णाला शासनाकडून आर्थिक लाभ मिळत असल्यामुळे देशाकडून खेळणे त्याच्यावर बंधनकारक असल्याचे संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 3:40 am

Web Title: leander paes ready to make rohan bopanna partner for double in davis cup
Next Stories
1 अखिल शेरॉनचा ‘सुवर्णवेध’
2 युवा खेळाडूंनी ऑलिम्पिक पदकाचा ध्यास घ्यावा!
3 आधी वन-डे नंतर कसोटी, आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय
Just Now!
X