05 August 2020

News Flash

भारतीय संघात लिएण्डर पेसचे पुनरागमन

दिविज शरणने वैयक्तिक कारणास्तव या लढतीतून माघार घेतली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील लढतीसाठी गुरुवारी आठ जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने संघात पुनरागमन केले आहे.

इस्लामाबाद येथे २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या लढतीसाठी भारताच्या अनेक अव्वल खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतली होती. मात्र अखेरच्या क्षणी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघानेच (आयटीएफ) ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने (एआयटीए) या खेळाडूंनाही भारतीय संघात स्थान दिले आहे. ही लढत कुठे खेळवायची, याबाबत सध्या आयटीएफ आणि यजमान पाकिस्तान टेनिस महासंघामध्ये (पीटीएफ) बोलणी सुरू आहेत.

पेसने जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर भारतीय संघात जागा मिळवली आहे. सुमित नागल, रामकुमार रामनाथन, शशिकुमार मुकुंद आणि रोहन बोपण्णा यांच्यासह जीवन नेदुनचेझियान, साकेत मायनेनी आणि सिद्धार्थ रावत यांना संघात स्थान देण्यात आले आहे. कौटुंबिक कारणास्तव प्रज्ञेश गुणेश्वरन या लढतीत खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत सुमित आणि रामकुमार यांच्यावर भारताची एकेरीतील भिस्त असेल. दुहेरीत पेस, बोपण्णा आणि जीवन हे तीन पर्याय भारताकडे आहेत.

पाकिस्तानात जाण्यासाठी तयार असलेल्या अर्जुन कढे, विजय सुंदर प्रसांत, एन. श्रीराम बालाजी आणि मनीष सुरेशकुमार यांना मात्र संघात स्थान मिळू शकले नाही. दिविज शरणने वैयक्तिक कारणास्तव या लढतीतून माघार घेतली आहे.

भारतीय संघ

सुमित नागल, रामकुमार रामनाथन, शशिकुमार मुकुंद, साकेत मायनेनी, रोहन बोपण्णा, लिएण्डर पेस, जीवन नेदुनचेझियान आणि सिद्धार्थ रावत

* कर्णधार : रोहित राजपाल

* प्रशिक्षक : झीशान अली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 12:24 am

Web Title: leander paes returns to indian team abn 97
Next Stories
1 श्रीकांतचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
2 भारतीय संघाने पराभव टाळला!
3 आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धा : भारताची १२ पदके निश्चित
Just Now!
X