News Flash

ली चोंग वेईला नाकाचा कर्करोग

ईला पहिल्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले असून सध्या त्याच्यावर तैवान येथे उपचार सुरू आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

माजी विश्वविजेता आणि मलेशियाचा जागतिक दर्जाचा अव्वल बॅडमिंटनपटू ली चोंग वेईला नाकाचा कर्करोग झाल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे.

वेईला पहिल्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले असून सध्या त्याच्यावर तैवान येथे उपचार सुरू आहेत. त्याच्यावरील उपचारांना तो चांगला प्रतिसाद देत असून, आराम आणि कुटुंबासमवेत राहून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या या अडचणीच्या काळात सगळ्यांनी काही पथ्ये पाळून त्याला साथ देणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांमध्ये त्याला तिसऱ्या टप्प्याचा कर्करोग झाल्याचे वृत्त झळकू लागल्याने वेगवेगळ्या वावडय़ा उठत होत्या. त्या पाश्र्वभूमीवर मलेशिया बॅडमिंटन संघटनेकडून हा खुलासा करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास संघटनेकडूनदेखील सर्वतोपरी साहाय्य केले जाणार असल्याचे सांगितले.

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून दिल्लीत

जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या यजमानपदाचा मान दोन दशकांहून अधिक काळाने भारताला मिळत आहे. नवी दिल्लीत १५ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा २००६मध्ये भारतात झाली होती. त्यावेळी भारताने चार सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकासह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले होते. २४ नोव्हेंबपर्यंत यंदा चालणाऱ्या या स्पर्धेत एम. सी. मेरी कोम सहाव्या विश्वविजेतेपदाच्या ईष्र्येने उतरणार आहे. तिने २००२, २००५, २००६, २००८,ा २०१० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

हसन, असगर, रशीदला दंड

पाकिस्तानचा अष्टपैलू हसन अली आणि अफगणिस्तानचे रशीद खान व असगर अफगाण यांनी सामन्यादरम्यान केलेल्या बेशिस्त वर्तनाबद्दल त्यांना सामन्यातील मानधनाच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

आशिया चषकातील सामन्यादरम्यान तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांनी केलेल्या अयोग्य वर्तनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आचारसंहितेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

जागतिक कलात्मक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी ‘साई’कडून निवड चाचणी

दीपा कर्माकर आणि राकेश पात्रा यांच्यासारखे भारताचे सर्वोत्तम जिम्नॅस्टिकपटू २९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) निवड चाचणीत सहभागी होणार आहेत.

पुढील महिन्यात २५ ऑक्टोबरपासून कतारमधील दोहा येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी ही चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी २९ आणि ३० सप्टेंबरला निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

या चाचणीतून सर्वोत्तम तीन मुले आणि तीन मुलींची निवड करण्यात येणार असल्याचे जिम्नॅस्टिकचे राष्ट्रीय प्रशिक्षक जी. एस. बावा यांनी सांगितले. दोहातील स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रतेची संधी मिळणार आहे.

कराटे महासंघाच्या निवडणुकीसाठी ऑलिम्पिक संघटनेची सुकाणू समिती

भारतीय कराटे महासंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने तीन सदस्यीय सुकाणू समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

ऑलिम्पिक संघटनेच्या या कृतीमुळे २३ सप्टेंबरला होणारी कराटे महासंघाची निवडणूक ही ग्राह्य धरली जाणार नसल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे त्या निवडणुकीला आता फारसा अर्थ उरला नसल्याचे संकेत मिळत आहेत. भुवनेश्वर कलिता यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत राकेश गुप्ता आणि सहदेव यादव यांचा समावेश आहे.  त्यामुळे नजीकच्या भविष्यात संघटनेची निवडणूक व्यवस्थितपणे होऊ शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 1:08 am

Web Title: lee chong wei diagnosed with nose cancer
Next Stories
1 Asian Team Snooker Championship – भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान, पाकिस्तानी चमूला सुवर्णपदक
2 महिला टी-२० : भारतीय महिलांची श्रीलंकेवर ५ गडी राखून मात, मुंबईकर जेमायमा रॉर्ड्रीग्जचं अर्धशतक
3 Pak vs Afg : सामना गमावल्यानंतर रडू कोसळलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची शोएब मलिकने काढली समजूत
Just Now!
X