News Flash

लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची सलामी स्विडलरशी

ही स्पर्धा म्हणजे मॅग्नस कार्लसन चेस टूरचा भाग असून विजेता ९ ते २० ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

संग्रहित छायाचित्र

 

पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद चेस २४ लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला असून सलामीच्या सामन्यात त्याला रशियाच्या पीटर स्विडलरशी झुंज द्यावी लागणार आहे.

करोनाच्या साथीमुळे गेले तीन महिने जर्मनीमध्ये अडकलेला भारताचा ग्रँडमास्टर आनंद मायदेशी परतला असून तो पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होत आहे. राऊंड-रॉबिन सामन्यांना मंगळवारपासून सुरुवात होणार असून नंतर आनंदला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला मॅग्नस कार्लसन, व्लादिमिर क्रॅमनिक, अनिश गिरी, पीटर लेको, इयान नेपोमनियाची, बोरिस गेलफंड, डिंग लिरेन आणि वॅसिल इव्हानचुक यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. ही स्पर्धा म्हणजे मॅग्नस कार्लसन चेस टूरचा भाग असून विजेता ९ ते २० ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 12:10 am

Web Title: legends cup chess tournament viswanathan anand opening with svidler abn 97
Next Stories
1 मँचेस्टर कसोटीत इंग्लंडचा विजय, विंडीजवर ११३ धावांनी मात
2 आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा मार्ग मोकळा, BCCI च्या भूमिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष
3 करोनामुळे टी-२० विश्वचषकाचं आयोजन आयसीसीने पुढे ढकललं
Just Now!
X