क्रिकेट या खेळात रोज नवेनवे किस्से घडत असतात. कधी गोलंदाज अनोख्या पद्धतीने गोलंदाजी करतो, कधी फलंदाज उलट्या बॅटने चेंडू टोलवतो तर कधी फिल्डर अजब प्रकारे चेंडू अडवतात. सध्यादेखील अशाच एका विचित्र फलंदाजीचा व्हिडाओ व्हायरल होत आहे. फुटबॉलच्या सामन्यात खेळल्याप्रमाणे एका फलंदाजाने हेडर मारून चेंडू टोलवल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

फुटबॉल या खेळात आपण अनेकदा ‘हेडर’ खेळल्याचे पाहिले आहे. गोल वाचविण्यासाठी किंवा चेंडू पास करण्यासाठी अनेकदा ‘हेडर’ मारला जातो. पण आता चक्क क्रिकेटमध्येही एका फलंदाजाने ‘हेडर’ खेळल्याचे दिसले आहे.

लंडनमध्ये सुरू असलेल्या कौंटी क्रिकेट स्पर्धेतील हा व्हिडीओ आहे. या स्पर्धेत हा प्रकार घडला. लेसेस्टरशायर क्लबचा फलंदाज मार्क कोस्ग्रोव्ह हा त्यावेळी फलंदाजी करत होता. गोलंदाजाने टाकलेला चेंडू त्याने हेडर मारून स्लिपच्या खेळाडूकडे ढकलला. त्याने चक्क चेंडू हेडर उडवला. मार्कचा हा फटका साऱ्यांनाच अनपेक्षित होता. पण बाऊन्सर चेंडू अशाप्रकारे सडेतोड उत्तर दिल्याचे पाहिल्यानंतर गोलंदाज काहीही न बोलता गप्पपणे पुन्हा चेंडू टाकण्यासाठी निघून गेला.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.